Ad will apear here
Next
‘वैद्यकीय सहायता योजना सामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे’
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

बारामती : ‘शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ  सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील ‍ प्रत्येकाने प्रयत्न करावेत,’ असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

बारामती हॉस्पिटलला पाटील यांनी सोमवारी भेट दिली. रुग्णालयाच्या विविध कक्षांची त्यांनी पाहणी केली. या वेळी  उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय पाटील, बारामती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. दिलीप लोंढे, उपाध्यक्ष डॉ. जे. जे. शहा, संचालक डॉ. संजय पुरंदरे, संचालक डॉ. गोकुळ काळे आदी उपस्थित होते.


पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना वेळीच आवश्यक ते उपचार ‍मिळाले पाहिजेत. उपचारासोबतच सर्वसामान्य रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आदी योजंनाबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून माहिती मिळणे गरजेचे आहे. या मदतीमुळे सर्वसामान्य कुटुंबावरील उपचाराचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल’.

या वेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा आढावा पाटील यांनी घेतला. ‘शासनाच्या विविध वैद्यकीय योजना व सुविधांचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना देण्याकरीता विशेष प्रयत्न केले जातील,’ असेही त्यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZUQCC
Similar Posts
अपंग भावासाठी बहिणीने साकारली अनोखी सायकल पुणे : बहीण-भावाच्या नात्याची गोष्टच काही निराळी असते. ‘भरजरी ग पीतांबर दिला फाडून...’ या गीतात सांगितल्याप्रमाणे बहीण आपल्या भावासाठी काहीही करू शकते. अशीच एक बहीण आहे मयुरी यादव. तिने आपल्या अपंग भावासाठी सायकलला जोडलेली व्हीलचेअर विकसित केली आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातदेखील तिच्या या प्रयोगाची निवड झाली आहे
पुणे, बारामती मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक नियुक्त पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, त्यांचे पुण्यात आगमन झाले आहे. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये त्यांचे वास्तव्य आहे, असे अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी,निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
‘सौंदर्य स्पर्धा हे महिलांसाठी उत्तम व्यासपीठ’ पुणे : ‘सौंदर्य स्पर्धा या महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धा म्हणजे केवळ सौंदर्यावर आधारीत नसतात, तर इथे बुद्धीमत्तेचाही कस लागतो. आजकाल रंग, वय असे निकष खूप बदलले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे
पांडुरंग तावरे यांना फिलिपिन्सचा कृषी पर्यटन पुरस्कार; कृषी पर्यटन दौऱ्याचे नेतृत्व करणार पुणे : फिलिपिन्स येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ सस्टेनेबल टुरिझम आणि फिलिपिन्स कृषी व पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारतीय शिष्टमंडळही सहभागी होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांचे चालक, अध्यापक आणि शासकीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language